इंजी आशिष बारेवार यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1991 रोजी गोरेगांव येथे बारेवार कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्री लक्ष्मीकांत बारेवार आणि आई श्रीमती रेखा बारेवार यांचा धाकटा मुलगा आहे. आशिष बारेवार यांनी 12 वी पर्यंत शहीद जान्या तिम्या जिल्हा परीषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव येथुन शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी गोंदिया येथुन सिव्हिलमध्ये अभियांत्रीकी पूर्ण केली. शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी अनेक यश मिळविले. उदा. इयत्ता 12 मध्ये गोरेगांव तालुका मध्ये प्रथम व बारावी तसेच पदवी स्तरावर डिस्टिंक्शन मिळविले. त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर क्रीडा क्षेत्रातही चांगली कामगीरी केली. राज्यस्तरीय शालेय स्पर्धा मध्ये हातोडा फेकने स्पर्धेत त्यांनी आपल्या शाळेचे प्रतिनीधिर केले. आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत तो इतर विद्यर्थयाना विविध प्रसंगी मदत करण्यासाठी पुढे आला आणि त्यांनी आपले नेतृत्वगुण दर्शविले.
अगदी वयाच्या 21 व्या वर्षी ते राजकारणात दाखल झाले आणि एका मोठ्या राजकिय पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष झाले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी शहरातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक जिंकली एवढेच नाही तरमगर तर नगर पंचायत गोरेगांवचे उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्षे निवडले गेले. 25 मे 2018 रोजी उपाध्यक्षपदी यशस्वी कालावधीनंतर नगर पंचायत गोरेगांवच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दरम्यान 2018 मध्ये ते प्रमुख राजकिय पक्षांच्या संयुक्त उमेदवाराचा पराभव करुन जिल्हा नियोजन समिती चे सदस्य म्हणून निवडले गेले.
त्यांच्या नगर पंचायतीच्या छोट्या कार्यकाळात त्यांनी परीवर्तनाची लाट सुरु करून बरीच प्रसिध्दी मिळविली. हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात नगरपंचायतीच्या विविध अनोख्या आणि नाविन्यपूर्ण कामांतून दिसून येते. त्यांनी युवा शक्ती स्पोर्ट्स क्लब ची स्थापना केली जे गेल्या 7 वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, क्रिडा व इतर क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमांवर निरंतर कार्यरत आहे. कचरा आणि घाणीने भरलेल्या पवन तलाव परिसराचे एका वर्षातच सुंदर बागेत रुपांतर झाले. या सर्वा व्यतिरीक्त ते अखिल भारतीय गायत्री परिवार चे सदस्यही आहेत आणि सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय भुमिका निभावतात.
Ashish Barewar was born on October 11, 1991, in the Barewar family in Goregaon. He is the youngest son of Mr. Laxmikant Barewar and Mrs. Rekha Barewar. Ashish completed his education up to the 12th grade at Shaheed Janya Timya District Council High School and Junior College in Goregaon. Afterward, he pursued a degree in civil engineering from Gondia. During his academic career, he achieved significant success. For instance, he secured the first position in the Goregaon taluka in the 12th grade and earned a distinction at both the 12th-grade level and the undergraduate level. He excelled not only in academics but also in sports. He represented his school in the state-level hammer throw competition. Throughout his educational journey, he consistently helped other students in various situations, displaying strong leadership qualities.
At just 21 years old, Ashish entered politics and became the taluka president of a major political party's student wing. At the age of 24, he won an election as an independent candidate by defeating a leader of the city's largest political party. Not only that, but he also served as the vice president of the Goregaon Municipal Council for two and a half years. After a successful term as vice president, he was elected president of the Goregaon Municipal Council on May 25, 2018. During the same period in 2018, he was also elected as a member of the District Planning Committee, defeating a prominent joint candidate from major political parties.
In his brief tenure with the municipal council, Ashish gained considerable fame by initiating a wave of transformation. This is evident from the various unique and innovative projects undertaken by the council under his leadership and guidance. He also founded the Yuva Shakti Sports Club, which has been continuously working for the past seven years on various social initiatives in education, health, sports, and other fields. Within just one year, a garbage-filled and polluted area around Pawan Lake was transformed into a beautiful garden. In addition to all this, Ashish is an active member of the All India Gayatri Parivar and plays a key role in all its programs.
Connect With Ashish...